Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. २२) अतिथी देवो भव ॥ २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं. ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. ३४) परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं. ५८) जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र! ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये. ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ९६) अंथरूण बघून पाय पसरा. ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. १०५) विद्या विनयेन शोभते ॥ १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. १०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. १०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. १११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. ११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! ११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. ११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. १२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. १२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. १२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! १२९) ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. १३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. १३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीन ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. १३५) प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका. १३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! १३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. १४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. १४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ? १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर ! १४४) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही. १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. १४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे! .

मिशन नवचेतना चंद्रपूर

 प्रगत  शैक्षणिक  महाराष्ट्र  अंतर्गत  चंद्रपूर  जिल्ह्यातील शाळेत कशाप्रकारे बदल घडवून आणले हे पहा. मा.कल्याणकर साहेब (माजी आयुक्त मनपा अकोला ) यांचे मिशन नवचेतना बद्दल अनुभव पहा.

                        

     

  आंतरराष्ट्रीय योग दिवसाची काही क्षणचित्रे

                     महानगरपालिका अकोला येथील मराठी , हिंदी व उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला .




योगासने संपूर्ण माहिती

योगासने संपूर्ण माहिती

https://drive.google.com/uc?export=download&id=0Bzv86o6GMsFMNjhYQkN0M0VxTE0 योगदिन शिष्टाचार पुस्तिका - मराठी  PDF

https://drive.google.com/uc?export=download&id=0Bzv86o6GMsFMMzktRWFaYXFTd0Eयोगदिन शिष्टाचार पुस्तिका - इंग्रजी  PDF

             ‘योगासने’
यातील मूळ शब्द योग व आसने. ‘योग’ हा शब्द मूळ संस्कृत धातू ‘युज्‌’ म्हणजे जोडणे यापासून तयार झाला आहे. त्यात अनेक संकेत आहेत. जीवात्मा व परमात्मा यांचा योग, हा योग साधण्यासाठी चंचल असलेल्या मनावर विशेष नियंत्रण आणावे लागते; त्यास योग म्हणतात. ‘चित्तवृत्तींचा निरोध’ अशी योगाची व्याख्या करतात. चित्तवृत्तींच्या पूर्ण निग्रहाने सविकल्पक व निर्विकल्पक समाधी साधता येते. समाधी म्हणजेच योग होय. हे योग्याचे जीवनध्येय असते. [⟶ योग; योगदर्शन].
योगसाधनेसाठी शरीराची विशिष्ट प्रकारची स्थिती ठेवणे व त्यात सुख वाटणे म्हणजे विशेष आसन होय. म्हणून ‘स्थिरसुखं आसनम्‌’ (स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे आसन) अशी आसनाची व्याख्या योगसूत्रांत केली आहे. शुद्ध मन नसलेले शरीर, स्थिर बुद्धी नसलेले शरीर कोणतेही महत्त्वाचे कार्य यशस्वी करू शकणार नाही, स्वस्थ व व्याधिमुक्त शरीराशिवाय मनावर नियंत्रण आणता येणार नाही.
योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये ठेवले जाते, त्यांना ‘योगासने’ म्हणतात. योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे यम, नियम, आसन, ⇨ प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व ⇨समाधी होत. यास ⇨अष्टांगयोग म्हणजे आठ अंगे असलेला योग असे म्हणतात. सुखावह स्थिरपणाने (कोणतीही हालचाल न करता) व शांत चित्ताने एखाद्या विशिष्ट स्थितीत दीर्घकाल राहता आले, म्हणजे ते ‘आसन’ साध्य झाले, असे म्हणता येईल. तसेच कोणत्याही शारीरिक बैठकीत किंवा स्थितीत सुखावह व यातनाविरहित रीतीने मनुष्यास नित्याच्या दैनंदिन कार्यात व्यग्र व एकाग्र राहता येणे, हे आसनांच्या अभ्यासाने साधले पाहिजे. त्याकरिता एकूण शारीरिक स्वास्थ्य टिकून राहणे जरूरीचे आहे. शरीरातील विविध इंद्रिये व संस्था - उदा., श्वसन, रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन इ. तसेच स्नायूसमूह, ज्ञानतंतू, मन यांसारखे घटक या सर्वांची कार्यक्षमता व परस्परसहनियमन यांचा विकास व्हावा लागतो व तो योगासनांच्या नित्य सरावातून साधता येतो. योगासनांच्या विविध स्थितींमुळे–हालचालींमुळे पाठीचा कणा (मेरुदंड) आणि त्यातील पृष्ठवंशरज्जू अर्थात मज्जारज्जू–ज्ञानतंतू–मज्जापेशी यांच्यावर इष्ट परिणाम होतो.


योगासने साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापासून मुला-मुलींनी करण्यास प्रत्यवाय नाही. योगासने करण्यासाठी प्रातःकाल फार चांगला; तथापि सायंकाळीही ती करण्यास हरकत नाही. योगासनांसाठी जागा शांत, स्वच्छ, हवेशीर व मनास प्रसन्न वाटेल अशी असावी. आसने अनशापोटी शक्यतो करावीत. अथवा पेय घेतल्यास किमान अर्धा तास तरी जाऊ द्यावा, जेवणानंतर किमान चार तास जाऊ द्यावेत; मात्र आसनांनंतर अर्ध्या तासाने जेवण घेण्यास हरकत नाही. आसने करताना स्वच्छ, हलके, सैलसर व आवश्यक तेवढेच कपडे घालावेत इ. प्रकारचे नियम सर्वसामान्यपणे सांगितले जातात. विशिष्ट प्रकारच्या आजारात, व्याधिग्रस्त व्यक्तींनी, त्या त्या आजारात अपायकारक ठरणारी आसने करू नयेत. स्त्रियांनी योगासने करण्यास काहीच हरकत नाही. मात्र मासिकपाळीच्या काळात व बाळंतपणात योगासने करू नयेत. आसने करीत असता श्वसनाची गती नेहमीसारखी सामान्य असावी. आसने करताना किंवा करून झाल्यावर श्वासाचा वेग वाढता कामा नये. घाम येऊ नये व दमल्यासारखे वाटू नये. उलट योगासने करून झाल्यावर व्यक्तीला शांत, प्रसन्न, उत्साही व आनंदी वाटले पाहिजे. योगासनांच्या अभ्यासाच्या प्रारंभी ती सावकाश व संथ गतीने करावीत. विशिष्ट आसन साध्य करण्यासाठी शरीराला झटके वा ताण देऊ नयेत. आसनांची आदर्श स्थिती साधेपर्यत, विशेषतः लवचिकपणा येईपर्यंत, आसनांच्या मध्यंतरी अथवा प्रत्येक आसनानंतर थोडी थोडी विश्रांतीही घ्यावी. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला झेपेल, त्याप्रमाणे एकेका आसनस्थितीचा काल व आवर्तन वाढविणे इष्ट व आरोग्यदृष्ट्या हिताचे असते.
 स्त्रोत-  विकासपीडिया

अधिक माहितीसाठी क्लिक करा .



http://mr.vikaspedia.in/health/HlthOth_Info/92a94d93093e92393e92f93e92e
http://globalmarathi.com/yogas.aspx

 

शैक्षणिक पुस्तके




शैक्षणिक पुस्तके

कोणत्याही बालकाच्या व्यक्तिमत्वाची जडण- घडण होत असताना  कुटुंब, शाळा व समाज हे तीन घटक महत्वाचे  असतात. मुलांचा महत्वाचा काळ हा शाळेत व्यतीत होत असतो. शिकण्याची प्रक्रिया हि कशी असावी, पद्धती कशी असावी याविषयी अनेक चर्चा केल्या जातात. शिक्षण औपचारीक असावे कि अनौपचारिक अश्या अनेक गोष्टींविषयी चर्चा सुरु आहेत. इंग्रजांनी लादलेली शिक्षण पद्धती अवलंबून गेल्या अनेक पिढ्यांचे नुकसान आपण केलेले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एकीकडे आपण जास्तीजास्त ज्ञानेंद्रियांचा वापर शिक्षण घेण्यासाठी करायला सांगतो आणि दुसरीकडे पाठ्यक्रमावर आधारित चार भिंतींच्या आतील शिक्षण मुलांना देतो.हे कितपत योग्य आहे? शिक्षण हे जीवन शिक्षण असलं पाहिजे. मला आठवतंय आमच्या लहानपणी आमच्या मराठी शाळेच नाव जीवन शिक्षण मंदिरअसं होत. पण नंतर ते नाव पुसलं गेल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस बदलेल नाव आल.
परंतु आता एक सकारात्मक बदल या क्षेत्रात होताना दिसतोय. अनेक विचारवंत या क्षेत्रात कार्यरत आहेत. योग्य शिक्षणपद्धतीच एक चांगला माणूस, एक निकोप पिढी तयार करू शकते. यासाठी जगभरात अनेक लोकांनी काही प्रयोग केले , नवनवीन निरिक्षने नोदवून ठेवलेत ते सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने शिक्षकांना उपयुक्त ठरतील अशा काही पुस्तकांची माहिती देण्याचा हा प्रयत्न.
पुस्तकाचे नाव - टीचर
मुळ लेखिका - सिल्विया ऑष्टन वॉर्नर,
मराठी अनुवाद अरुण ठाकूर
मावरी मुलांच्या बालवाडीत कुठलाही विषय शिकविणे म्हणजे जणू त्यांना दुसरया संस्कृतीशी जोडणाऱ्या एखाद्या लाकडी पुलाच्या निर्मितीतील एक एक फळी जोडत जाण्यासारखेच आहे. हा पूल जितका बळकट होईन तितकंमावरींची पुढच्या आयुष्यात यशस्वी ठरविण्याची शक्यताही बळकट होत जाईल.
बहुतेक मावरी मुले या संक्रमणात अपयशी ठरतात.कोवळ्या वयात एका संस्कृतीतून दुसर्या संस्कृतीत ढकलण्याच्या धक्क्यातून मुले सहसा सावरली जातच नाहीत. त्याचा परिणाम स्पष्टपणे व अबोधपणे जाणवत राहतो.याचमुळे शिक्षण प्रवाहात येणाऱ्या मावरींची संख्या रोडावते. जे शिकतात, तेही अनेकदा, मानसिक दुर्बलतेची शिकार होतात.एकूणच मावरी मुले शिक्षनात मागेच पडत जातात.
न्यूझीलंड सारख्या मागास देशात आदिवासी समूहांबरोबर जिद्दीने काम करणाऱ्या शिक्षिकेची हि कहाणी, नक्कीच शिकवण्याची आणि शिकण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडेल.
पुस्तकाचे नाव - तोत्तोचान
लेखिका - तेत्सुको कुरोयानागी
अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी
जपानमध्ये तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायशी यांच्याबद्दल लिहिलेले हे पुस्तक. तोमोई हि तोत्तोचांची शाळा आणि कोबायशी हे त्याचे कल्पक मुख्याध्यापक. तोत्तोचान हि छोटीशी चिमुरडी, शाळेच्या चार भिंतीत न रमणारी. इतर शाळांतून शिक्षकानी तिला त्रासून शाळेतून काढून टाकलय. योगायोगाने तिला कोबायशोची शाळा भेटते आणि तीच जीवनच बदलून जात. हि गोष्ट कुठेही कल्पनेतली नाही तर प्रत्यक्षात घडलेली आहे.
बाईंच शिकवण सोडून चिमण्याच खेळ पाहत बसणारी तोत्तोचान, रोजच्या वेळेत रस्त्याने जाणार्या ब्यांडवाल्यांची वाट पाहणारी आणि संपूर्ण वर्गाला सोबत घेऊन त्यांची मजा घेणारी तोत्तोचान. साहजिकच शाळेतून काढून दिली जाते आणि मग तिला तोमोई भेटते. रेल्वेच्या डब्यात भरणारे वर्ग, भूतांची भीती घालवण्यासाठी मुलांनाच भुताचे वेश घालून रात्रीची पडक्या विहिरीकडे केलेली सफर. आणखी खूप काही काही. मुलाचं भावविश्व आणि शिकण्याची उत्मी समजून घेण्यासाठी वाचायलाच हव.
आता तू या शाळेचीहे मुख्याध्यापकाकडून ऐकल्यावर दुसर्या दिवशीची वाट पाहन तोत्तोचानला कठीण झाल होत.यापूर्वी कुठल्याच दिवसाची तीन इतकी उत्कंठतेने वाट पहिली नव्हती. छोट्या तोत्तोचानन तोमोई मधाळ ते वातावरण अनुभवलं होत.
कालची चिमुरडी तोत्तोचान आज जपान मधील लोकप्रिय दूरदर्शन कलाकार तेत्सुको कुरोयानागी म्हणून ओळखली जाते. तिच्या शाळेबद्दल ती खूप काही सांगत राही.
पुस्तकाचे नाव - दिवास्वप्न
लेखक -गिजुभाई बधेका
अनुवाद - शोभा भागवत
शाळेतील पाठ्यक्रम आणि प्रचलित अध्ययन पद्धतीत न रमणाऱ्या प्रयोगशील शिक्षकची हि कथा.
पुस्तकातील काही भाग
मैं कक्षा में आया और लडकों से कहा-आज अब और काम नहीं करेंगे। कल अपना नया काम शुरू होगा। आज तो तुम सब छुट्टी मनाओ।’ ‘छुट्टीशब्द सुनते ही लड़के हो-होकरके कमरे से बाहर निकले और सारे स्कूल में खलबली मच गई। सारा वतावरण छुट्टी, छुट्टी, छुट्टीके शब्दों से गूंज उठा। लड़के उछलते-कूदते और छलाँग भरते घरों की तरफ भागने लगे।
दूसरे शिक्षक और विद्यार्थी ताकते रह गए। यह क्या है ?’ प्रधानाध्यापक एकदम मेरे पास आए और ज़रा भौहें तानकर बोले-आपने इन्हें छुट्टी कैसै दे दी ? अभी तो दो घंटों की देर है।

मैंने कहा-जी, लड़कों की आज इच्छा नहीं थी। वे आज अव्यवस्थित भी थे शान्ति के खेल मैं मैंने यह अनुभव किया था।
प्रधानाध्यापक ने कड़ी आवाज में कहा-लेकिन इस तरह आप बगैर मुझसे पूछे छुट्टी नहीं दे सकते। एक कक्षा के लड़के घर चले जाएँगे तो दूसरे कैसे पढ़ेंगे ? आपके ये प्रयोग यहाँ नहीं चलने वाले।
उन्होंने ज़रा रोष में आकर फिर कहा-अपनी यह इच्छा-विच्छा रहने दीजिए शान्ति का खेल तो होता है मोंटेसरी शाला में। यहाँ प्राथमिक पाठशाला में तो चट तमाचा मारा नहीं और पट सब चुप नहीं ! और फिर नियामानुसार सब पढ़ते-पढ़ाते है। आप उसी तरह पढ़ायेंगे तो बारह महीनों में कोई परिणाम नजर आएगा। आज का दिन तो यों ही गया, और उल्लू बने, सो अलग।

मुझे अपने प्रधानाध्यापक पर दया आई। मैंने कहा-साहब, तमाचा मारकर पढ़ाने का काम तो दूसरे सब कर ही रहे है और उसका फल मैं तो यह देख रहा हूँ कि लड़के बेहद असभ्य, जंगली, अशान्त और अव्यवस्थित हो चुके है। मैंने तो यह भी देख लिया है कि इन चार वर्षों की शिक्षा में लड़कों ने तालियाँ बजाना और, ‘हा, हा,’ ‘हू, हू,’ करना ही सीखा है ! उन्हें अपनी पाठशाला से प्रेम तो है ही नहीं। छुट्टी का नाम सुना नहीं कि उछलते-कूदते भाग गए !

प्रधानाध्यापक बोले-तो अब आप क्या करते है, सो हम देख लेंगे।
मैं धीमे पैरों और बैठे दिल से घर लौटा। लेटे-लेटे मैं सोचने लगा-काम बेशक मुश्किल है ! लेकिन इसी में मेरी सच्ची परीक्षा है। चिन्ता नहीं। हिम्मत नहीं हारनी चाहिए। इस तरह कहीं शान्ति का खेलहोता है ? मोंटेसरी-पद्धति में इसके लिए शुरू से कितनी तालीम दी जाती है ? मैं भी कितना मूर्ख हूँ जो पहले ही दिन से यह काम शुरू कर दिया ! पहले मुझे उन लोगों से थोड़ा परिचय बढ़ाना चाहिए। मेरे लिए उनके दिल में कुछ प्रेम और रस पैदा होना चाहिए। तब कहीं जाकर वे मेरा कुछ कहना मानेंगे। जहाँ पढ़ाई नहीं, बल्कि छुट्टी प्यारी है, वहाँ काम करने के माने है, भगीरथ का गंगा को लाना !
दूसरे दिन के काम की बातें निश्चित कीं और मैं सो गया। रात तो आज के और अगले दिन के काम के सपने देखने में ही बीत गई !
माहिती दाता : नीलिमा जोरवर