Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. २२) अतिथी देवो भव ॥ २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं. ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. ३४) परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं. ५८) जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र! ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये. ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ९६) अंथरूण बघून पाय पसरा. ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. १०५) विद्या विनयेन शोभते ॥ १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. १०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. १०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. १११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. ११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! ११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. ११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. १२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. १२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. १२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! १२९) ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. १३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. १३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीन ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. १३५) प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका. १३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! १३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. १४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. १४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ? १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर ! १४४) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही. १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. १४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे! .

शब्दांचा डोंगर

शब्दांचा डोंगर



उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे.
          2)शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे.
          3)शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे.
         4)विशेषणांना योग्य वापर करता येणे.
         5)निबंध लेखनाची पूर्वतयारी.
        6)कल्पना शक्तीला चालना.

       

             
         वडी
       ही वडी आहे
    ही गोड वडी आहे
ही गोड तिळ गुळाची वडी आहे
 ही गोड तिळ गुळाची पौष्टी  वडी आहे
ही गोड तिळ गुळाची पौष्टीक चौकोनी वडी आहे
ही गोड बारीक केलेल्या  तिळ  गुळाची पौष्टीक वडी आहे  

            झाड
       ते झाड आहे
    ते झाड हिरवेगार आहे
  ते झाड खूप खूप उंच आहे
ते झाड गोड आंबट चिंचेचे आहे.
ते झाड चिंचा खायला याअसे बोलावत आहे
चला चला सारे जाऊ गोड आंबट चिंचा खाऊ

         नाव
      माझे नाव
माझे नाव तन्मय
माझे नाव तन्मय आहे
माझे बाबा मला तनू म्हणतात
माझी आई मला तनूबाळ म्हणते

     पेन
हा पेन आहे .
हा काळा पेन आहे .
हा काळा पेन चांगला चालतो .
हा काळा पेन चांगला चालतो पन महाग आहे .
   बाहुली.
माझी बाहुली.
माझी छान बाहुली.
माझी छान नाजुक बाहुली.
माझी छान नाजुक सुंदर बाहुली.
माझी छान नाजुक सुंदर बाहुली डोळे फिरविते.

                 घर
            माझे घर
        माझे सुंदर घर
      माझे खूप सुंदर घर
   माझे घर खूप सुंदर आहे
माझे घर मला खूप खूप आवडते
माझे घर खूप सुंदर व मोठे आहे .
तसेच माझे घर मी खूप खूप सुंदर ठेवतो.
माझ्या  घराजवळ खूप सुंदर जागा आहे तिथे आम्ही खेवतो.
माझ्या घराजवळ एक मोठी सुंदर शाळा आहे तिथे आम्ही शिकतो.     
  चाचणी.
माझी  चाचणी.
माझी चाचणी  आहे.
माझी पायाभूत चाचणी आहे.
माझी पायाभूत चाचणी भाषा व गणित विषयाची.          
माझी पायाभूत चाचणी भाषा व
गणित विषयाची उदया आहे.
 बाग
          माझी बाग
       माझी सुंदर बाग
    माझ्या शाळेत बाग आहे
माझ्या शाळेत सुंदर बाग आहे
माझ्या शाळेभोवती खूप सुंदर बाग आहे.
माझ्या शाळेभोवती खूप खूप सुंदर बाग आहे.
माझ्या दोन्ही वर्गाच्या समोर खूप सुंदर बाग आहे.
माझ्या शाळेत सुंदर बाग आहे त्या बागेत मुले  खेळतात.
माझ्या शाळेत सुंदर बाग आहे त्या बागेत मुले आनंदाने खेळतात.
              कुत्रा
            हा माझा कुत्रा
   हा माझा कुत्रा कुत्र्याच शेपूट
हा माझा कुत्रा कुत्र्याच शेपुट     वाकड आहे.
हा माझा मोती कुत्रा,कुत्याचे शेपूट वाकडे आहे.
हा माझा लाल रंगाचा मोती कुत्रा,कुत्र्याचे शेपूट वाकडे आहे.
हा माझा लाल रंगाचा मोती कुञा , कुञ्याचे शेपूट नेहमी वाकडेच असते. तरीही तो प्रामाणिक असते
हा माझा लाल रंगाचा मोती  कुञा, कुञ्याचे शेपूट नेहमी वाकडेच असते.तरीही तो प्रामाणिकपणे गळीबोळात फिरतो.जे खायला दील ते पटकन खातो
हा माझा लाल रंगाचा मोती कुत्रा कुत्र्याच शेपुट नेहमी वाकडे असते तरीही तो शेताची राखन करतो कारण तो प्रामाणिक असतो . जे खायला दील ते पटकन खातो . या घरात त्या त्या दारात फिरतो
 वाचतो.
अवधूत वाचतो.
अवधूत मराठी वाचतो.
अवधूत मराठी उतारा वाचतो.
अवधुत मराठी उतारा व कविताही वाचतो.
अवधूत मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
अवधूत रोज मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
अवधूत रोज कमल सोबत मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
अवधूत रोज कमल व इतर मित्रांसोबत मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
         शाळा
         माझी शाळा
       ही माझी शाळा.
   ही माझी शाळा आहे.
 माझी शाळा सुंदर आहे.
माझी शाळा खूप सुंदर आहे.
माझी शाळा खूप सुंदर व छान आहे.
माझी शाळा खूप सुंदर,छान व मोठी आहे.
माझी शाळा खूप सुंदर,स्वच्छ,छान व मोठी आहे.
       दे मला
      आई मला फुल दे  
आई मला फुल दे ताई मला येउ दे                                                                                                                                                                   आई मला फुल दे ताई मला येउ दे    मामाच्या गावाला जाऊ दे
 आई मला फुल दे ताई मला येउ दे मामाच्या गावाला दे अन तेथिल सुंदर शाळा पाहु दे
 आई मला फुल दे ताई मला येउ दे मामाच्या गावाला दे अन तेथिल सुंदर शाळा पाहु दे. ही माझी मनोकामना पूर्ण होऊ दे.

      पाऊस पडतो
पाऊस पडत आहे
मुसळधार पाऊस पडत आहे
शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारा व विजांच्या कडकडटासह वारा व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारा व विजांच्या कडकडटासह वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर  परिसरात आणि आजूबाजूच्या गावात गारा व विजांच्या कडकडटासह भीतीदायक वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर  परिसरात आणि आजूबाजूच्या गावात गारा व विजांच्या कडकडटासह भीतीदायक वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर  परिसरात आणि आजूबाजूच्या गावात गारा व रौद्ररूप धारण करून  विजांच्या कडकडटासह भीतीदायक वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर  परिसरात आणि आजूबाजूच्या गावात संततधार गारा व रौद्ररूप धारण करून विजांच्या कडकडटासह वारा वाहत आहे व पाऊस पडत आहे.
  

 आज रविवार

आज रविवारची सुट्टी
आज रवीवरची सुट्यी आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा बाजार आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने खूप आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने खुप मजेचा व  आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ असणारा हा खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ असणारा हा खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ, किलबिलाट असणारा हा खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ, किलबिलाट असणारा रंगीबेरंगी कपडे, फुले , लहान लहान मुले असा हा रंगीतसंगीत खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ, किलबिलाट असणारा रंगेबेरंगी कपडे,फुले ,लहान लहान मुले  हा खूप मजेचा व आनंदाचा व माझ्या आवडीचा दिवस आहे.

          झाडे
झाडे मित्र असतात
झाडे आपले मित्र असतात
झाडे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे आपले खरे जिवलग मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे ,जमिनीची धूप थांबवणारे आपले खरे जिवलग मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे ,जमिनीची धूप थांबवणारे फक्त आपलेच नाही तर सर्व निसर्गाचे  खरे जिवलग मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे ,जमिनीची धूप थांबवणारे फक्त आपलेच नाही तर सर्व निसर्गाचे  खरे जिवलग मित्र असल्याने आपण हि त्यांचे रक्षण करून मैत्रीचे ऋणानुबंध जपले पाहिजेत.  संकलन
🏡शाळा🏡
ही माझी शाळा
ही माझी शाळा मला आवडते
हि माझी शाळा मला खूप आवडते
हि माझी शाळा मला खूप खूप आवडते
हि माझी शाळा व माझे गुरुजी मला खूप खूप आवडतात
हि माझी शाळा व माझे प्रेमळ गुरुजी मला खूप खूप आवडतात
हि माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान गुरुजी मला खूप खूप आवडतात
हि माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र, शाळेचा परिपाठ मला खूप खूप आवडतो
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र, शाळेचा परिपाठ,खेळाचा तास मला खूप खूप आवडतो
ही माझी आदर्श शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र, शाळेचा परिपाठ,खेळाचा तास, रंगीत भिंती, शाळेतील साहित्य, शाळेतील हि मज्जा, गंमत मला खूप खूप आवडते.

   
                  मोबाईल
               मोबाईल आहे
             हा मोबाईल आहे
       हा माझा मोबाईल आहे
हा माझा नवीन मोबाईल आहे
हा माझा नवीन सॅमसंगचा मोबाइल आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाईल खूप सुंदर आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाईल खूप सुंदर व भरपूर अॅप असलेला आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला व उपयुक्त आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला उपयुक्त शैक्षणिक साधन आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला उपयुक्त दॄकश्रवण शैक्षणिक साधन आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला मुलांसाठी उपयुक्त दॄकश्रवण शैक्षणिक साधन आहे


🔰पेन 🔰
👉🏾माझा पेन
👉🏾हा माझा पेन आहे
👉🏾हा माझा बॉलपेन आहे
👉🏾हा माझा बॉलपेन निळ्या रंगाचा आहे
👉🏾हां माझा बॉलपेन निळ्या रंगाचा व आकर्षक आहे
👉🏾हां माझा बॉलपेन निळ्या रंगाचा आकर्षक व सेलो कंपनीचा आहे
👉🏾हा माझा बॉलपेन निळ्या रंगाचा आकर्षक ,सेलो कंपनीचा व भरभर  चालणारा आहे.
👉🏾हा माझा बॉलपेन निळ्या रंगाचा,सेलो कंपनीचा,भरभर  चालनारा व सुंदर अक्षरे काढ़णारा आहे
*====================*

 दप्तर
माझे दप्तर
हे माझे दप्तर
माझे दप्तर सुंदर आहे
माझे दप्तर मला खूप आवडते
माझ्या दप्तरात सगळ्या प्रकारचे कप्पे आहेत.
माझ्या बाबांनी मला छान दप्तर आणले आहेत.
माझ्या दप्तराचा रंग पांढरा , काळा व हिरवा आहे.
माझ्या दप्तर शाळेत सर्व मिञांना , शिक्षकांना खूप खूप आवडतो.

खडू
माझा खडू
हा माझा खडू
माझा खडू सुंदर आहे
माझा खडू मला खूप आवडतो.
माझा खडू मला खूप खूप आवडतो.
  खडूचा उपयोग  लिहण्यासाठी व चिञ काढण्यासाठी  होतो .
माझ्या खडूचे रंग पांढरा , हिरवा लाल , पिवळा असतो.

 पान
पान दे
आई पान दे
आई मला पान दे
आई मला झाडाचे पान दे
आई मला वडाचया झाडाचे पान दे
आई मला वडा चया झाडाचे सुंदर पान दे
आई मला वडा चया  झाडाचे सुंदर लांब पान दे

मी
मी येतो
मी उद्या येतो
मी उद्या घरी येतो
मी उद्या ताईबरोबर घरी येतो
मी उद्या ताई आणि दादाबरोबर घरी येतो
मी उद्या ताई आणि दादाबरोबर आजीला घेऊन घरी येतो

खेळणी
माझी  खेळणी
माझी  मातीची  खेळणी
माझी मातीची कागदाची खेळणी
माझी मातीची  कागदाची  रंगीत खेळणी
माझी मातीची कागदाची रंगीत खेळणी मला  आवडतात
माझी मातीची  कागदाची रंगीत  खेळणी मला  खूप आवडतात
माझी  मातीची  कागदाची  रंगीत  खेळणी  मला  दादा खुप  आवडतात
माझी मातीची  कागदाची  रंगीत  खेळणी  मला  दादाला ताईला  पण  खुप  आवडतात

लिहतो
मी  लिहतो
मी नाव  लिहतो
मी माझ नाव लिहतो
मी माझ आणि तुझ  नाव  लिहतो
मी माझ आणि तुझ  नाव फळ्यावर  लिहतो
मी  माझ  आणि  तुझ  नाव  फळ्यावर लिहतो आणि वाचून दाखवतो
मी  माझ  आणि  तुझ  नाव फळ्यावर  लिहतो  आणि सरांना  वाचून  दाखवतो


असच  इंग्रजीत  पण  घेता  येईल
reading
I am reading
I am reading a book
I am reading a story book
I am reading a nice story book
I am reading a nice story book with nikita
I am reading a nice story book with my friend nikita
 writing
I am writing
I am writing a name
I am writing my  sister's name
I writing my sister's and  brother's name
I am writing my sister's and brother's name on the  floor
I writing my sister's and brother's name on floor with Sleat pencil

i am going
i am going to school
i am going to school for learning
i am going to school with my brother for learning
iam going to school with my brother for being good human...gurukul


थेंब
पावसाचे  थेंब
पावसाचे  थेंब  आले
पावसाचे  थेंब  वरून  आले
पावसाचे  थेंब  वरुन  आकाशातून  आले
पावसाचे थेंब वरुन  आकाशातून  सरसर  आले
पावसाचे  थेंब  वरुन  आकाशातून  सरसर  खाली  आले
पावसाचे  थेंब  वरुन आकाशातून सरसर  खाली  आले  ओले  करून  गेला
पावसाचे  थेंब  वरुन  आकाशातून सरसर खाली   आले शेते  ओले करून  गेले
पावसाचे थेंब  वरुन  आकाशातून सरसर खाली  आले  शेते  ओले  करून  गेले नाले भरून  गेले
पावसाचे  थेंब  वरुन आकाशातून सरसर  खाली  आले शेते  ओले  करून  गेले  नदी  नाले  भरून  गेले

चित्र
मी  चित्र  काढते
मी  फुलाचे  चित्र  काढते
मी सुंदर  फुलाचे  चित्र काढते
मी  सुंदर  फुलाचे  चित्र  काढते  आणि  रंगवते
‬: पणती
छोटीशी  पणती
छोटीशी पणती प्रकाश देते
छोटीशी  पणती घर भरुन  प्रकाश देते
छोटीशी पणती घर  भरून  प्रकाश  देते म्हणून  मला  आवडते
‬: drawing
I am drawing
I am drawing a ball
I am drawing a big ball
I drawing a big ball and bat
I am drawing a big ball and bat on the blackboard

‬: Looking
she is looking
she is looking a butterfly
she is looking a blue butterfly
she is looking blue butterfly in the garden


‬: कमळ.
कमळ बघ.
आई कमळ बघ.
आई लाल कमळ बघ.
आई सुंदर लाल कमळ बघ.
आई तलावात सुंदर लाल कमळ बघ.
आई बागेतली तलावात सुंदर लाल कमळ बघ.
: A Mango.

It is a Mango.
It is a big Mango.
It is a big sweet Mango
It is a big sweet juicy Mango.
It is a big sweet, juicy, yellow Mango.
There is a big sweet, juicy, yellow Mango on the tree.
There is a big sweet,juicy, yellow Mango on the tree of my garden

       
 Friend   .                                              my friend  .  
  my best  friend  .  
rahul  is  my  best  friend   .    
  rahul is  my  best  friend  of  my  class.
rahul  is my best friend  of  my  class  and  he  helps  me.
  Rahul  is  my  best  friend  of my  class  and  he  always  helps  me
My Mother.
I like my Mother.
I like my sweet Mother.
I like my sweet , lovely Mother.
I like my sweet , lovely, hard working mother.
I like my sweet, lovely, hard working ,beautiful mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional, caring mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional,caring mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional, caring , confident
mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional ,caring,confident , happy natured mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional ,caring,  confident , happy natured , helpful mother and I love her so much
 

I wear white shirt on Monday.
I wear white shirt on Monday, black on Tuesday.
I wear white shirt on Monday, black On Tuesday, blue on Wednesday.
I wear white shirt on Monday, black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday.
I wear white shirt on Monday,black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday, green on Friday
I wear white shirt on Monday,black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday, green on Friday, brown on Saturday.
I wear white shirt on Monday,black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday, green on Friday, brown on Saturday And red on sundAy.

ज्ञान.
माझे ज्ञान.
माझे ज्ञान सखोल ज्ञान.
माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान.
माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
माझ्या गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
माझ्या आडे गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
माझ्या आडे गुरूजींमुळे व नारायण गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
माझ्या दोन्ही उपक्रमशील गुरूजींमुळे म्हणजेच,आडे गुरूजींमुळे व नारायण गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.


 Rose.🌹

 Rose is a flower.
Rose is a beautiful flower.
Rose is a beautiful, nice smelling flower.
Rose is a beautiful, nice smelling flower which people use to welcome someone.
Rose is a beautiful, nice smelling flower which people use to welcome someone or to congratulate someone.
Rose is a beautiful, nice smelling, different coloured flower which peopleuse to welcome someone or to congratulate someone.
Rose is a beautiful, nice smelling, different coloured flower which is a sd symbol of love, king of flowers and people use to welcome someone or to congratulate someone.
गाय
माझी गाय
माझी कपिला गाय
माझी आवडती कपिला गाय
माझी आवडती सुंदर कपिला गाय
माझी आवडती सुंदर कपिला गोंडस गाय
माझी आवडती सुंदर कपिला गोंडस प्रेमळ गाय
माझी आवडती सुंदर कपिला गोंडस प्रेमळ मायाळू गाय


*भ्रमणध्वनी*
माझा भ्रमणध्वनी
माझा भ्रमणध्वनी छान
माझ्या भ्रमणध्वनीचा वापर छान
माझ्या भ्रमणध्वनीचा वापर मी करतो.
माझा  भ्रमणध्वनी मला खूप खूप  आवडतो.
माझा भ्रमणध्वनी माझ्या  मिञाला खूप खूप आवडतो.
माझ्या भ्रमणध्वनीचा वापर मी चांगल्या कामासाठी सतत करतो.
माझ्या भ्रमणध्वनीमुळे मी सतत इतरांच्या  संपर्कात राहण्यास मदत होते.
माझ्या भ्रमणध्वनीमुळे मला इतरांकडून खूप उपयुक्त माहिती मला मिळत असते.
माझ्या भ्रमणध्वनीमुळे मला मिळालेल्या चांगल्या गोष्टीचा फायदा माझ्या शाळेतील मुलांना होतो.
माझ्या भ्रमणध्वनीमुळे माला मिळालेल्या चांगल्या गोष्टी मुलांना दाखवल्यावर मुले खूप खूप खूष होतात.

      
   *ताई*

माझी ताई
माझी ताई मला आवडते
माझी ताई मला खूप आवडते
माझी ताई मला खूप खूप आवडते .
माझी ताई मला खूप खूप प्रेम देते.
माझी ताई आणि मी रक्षाबंधन सण साजरा करतो.
माझ्या सर्व ताईंनी मला रक्षाबंधन दिवशी खूप राख्या बांधल्या.
माझ्या प्रत्येक ताईला मी रक्षाबंदन दिवशी खूप छान भेटवस्तू दिल्या.
माझ्या प्रत्येक ताई प्रमाणेच मी इतर महिलांचे रक्षण प्रामाणिकपणे करत राहीन .
माझ्या प्रत्येक ताईला या जगात चांगले स्थान मिळण्यासाठी  सदैव प्रयत्न करत राहीन .
माझ्या प्रत्येक ताईला या जगात मी चांगले स्थान मिळण्यासाठी  सदैव प्रयत्न करत राहीन


*दादा*
माझा दादा
माझा विष्णू दादा
माझा दादा सुंदर आहे
माझा दादा प्रत्येकाची काळजी घेतो.
माझा दादा प्रत्येकाची खूप काळजी घेतो.
माझा दादा खूप प्रेमाळू व दयाळू आहे.
माझा दादा प्रत्येक गोष्ट मला पुरवठा करत असतो.
माझा दादा खूप कष्ट करून मला शिक्षण देत असतो.
माझा दादा माझी प्रत्येक गरज कष्ट करून पुरवठा करत असतो.
माझा दादा मला प्रत्येक जन्मी मिळो आशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
दादा

सर्व दादा.
ग्रुप मधील सर्व दादा.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा छान.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा खूप छान.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा स्वभावाने खूप छान.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा मनमिळाऊ व स्वभावाने खूप छान.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा मनमिळाऊ,समजूतदार व स्वभावाने खूप छान.
आमचे ग्रुप मधील सर्व दादा मनमिळाऊ, समजूतदार व स्वभावाने खूप छान म्हणून सर्वांचे लाडके.
Pen
       A pen
    A red pen
A red long pen
It is A red long pen
It is my favourite red long pen
It is my favorite red long pen with a blue cap
It is my favorite red long pen with a blue cap that's  my birthday gift

It is my favorite  red long pen with a blue cap that's my birthday gift by my best friend.

*शब्द*
    *अक्षरांचा शब्द*
 *अक्षरांचा होतो शब्द*
*अनेक अक्षरांचा होतो शब्द*
*स्वरचिन्ह युक्त अक्षरांनी होतो शब्द*
*'र'च्या जोडाक्षरांनी होतो शब्द*
*जोडाक्षरांनी तयार होतो जोडशब्द*
*समानार्थाने तयार होतो समानार्थी शब्द*
*विरुद्ध अर्थाने तयार होतो विरुद्धार्थी शब्द*
*अनेकशब्दांबद्दल  असतो एक शब्द*
*समुहाबद्दल तयार होतो समुहदर्शक शब्द*
*अनेक अर्थाने तयार होतो तो शब्द*

*----------------------------*
‬: दगड
दगड बघ.
आई दगड बघ.
आई काळा दगड बघ.
आई छोटा काळा दगड बघ.
आई छोटा,काळा, गोल दगड बघ.
आई छोटा ,काळा ,गोल व मऊ दगड बघ.
‬: पेरू.
पेरू दे .
आई पेरू दे.
आई मला पेरू दे.
आई मला पिवळा पेरू दे.
आई मला पिवळा गोड पेरू दे.
आई मला पिवळा पिकलेला गोड पेरू दे.
‬: आंबा.
आंबा पिवळा रंग.
आंबा पिवळा रंग , आंबट चव.
आंबा पिवळा रंग, आंबट व गोड चव.
आंबा पिवळा रंग , आंबट व गोड चव , फळांचा राजा.
आंबा पिवळा रंग , आंबट व गोड चव , फळांचा राजा मला आवडतो.
‬: कैरी .
कैरी हिरवा रंग.
कैरी हिरवा रंग त्याचे लोणचे.
कैरी हिरवा रंग त्याचे लोणचे  , पनं.
कैरी हिरवा रंग त्याचे लोणचे प नं , आमरस.
कैरी हिरवा रंग त्याचे लोणचे प नं , आमरस, लुंजी मला आवडते.
‬: पान .
पान दे.
दादा पान दे.
दादा मला पान दे.
दादा मला हिरवे पान दे.
दादा मला हिरवे छोटे पान दे.
दादा मला हिरवे छोटे सुंदर पान दे.
दादा मला हिरवे छोटे सुंदर व गोल पान दे.
‬: पान .
पान दे.
दादा पान दे.
दादा मला पान दे.
दादा मला हिरवे पान दे.
दादा मला हिरवे छोटे पान दे.
दादा मला हिरवे छोटे सुंदर पान दे.
दादा मला हिरवे छोटे सुंदर व गोल पान दे.
दादा मला ते हिरवे टोकदार पान पण दे


पान
छान पान.
हिरवेगार छान पान.
रेषांचे हिरवेगार छान पान.
 लांबट रेषांचे हिरवेगार छान पान.
फिकट लांबट रेषांचे हिरवेगार छान पान.
 सरळ फिकट लांबट रेषांचे हिरवेगार छान पान.
टोकदार सरळ फिकट लांबट रेषांचे हिरवेगार
 छान पान.
टोकदार सरळ फिकट लांबट रेषांचे वाकडे हिरवेगार छान पान.
टोकदार सरळ फिकट लांबट रेषांचे वाकडे जाळीदार हिरवेगार छान पान.
टोकदार सरळ फिकट,लांबट रेषांचे, वाकडे, जाळीदार,हिरवेगार,छान पान.
टोकदार सरळ फिकट लांबट रेषांचे वाकडे जाळीदार हिरवेगार गुळगुळीत छान पान.
टोकदार सरळ फिकट लांबट रेषांचे वाकडे जाळीदार हिरवेगार गुळगुळीत सुगंधीत छान पान.
टोकदार सरळ फिकट लांबट रेषांचे वाकडे जाळीदार हिरवेगार गुळगुळीत सुगंधीत औषधी छान पान.
           
           पोळा
        माझा पोळा हा सण
      माझा पोळा हा सण बैलाचा
माझा पोळा हा सण बैलाचा , कष्टकर्याचा
माझा पोळा हा सण बैलाचा कष्टकर्याचा,दीन दुबळ्याचा
माझा पोळा हा सण बैलाचा ,कष्टकर्याचा , दिनदुबळ्याचा , जगाच्या
         पोशिंद्याचा
माझा पोळा सण बैलाचा ,कष्टकर्याचा ,दीनदुबळ्याचा ,जगाच्या पोशिंद्याचा ,लहान लहान चिमुकल्याचा
माझा पोळा हा सण बैलाचा , कष्टकर्याचा , दिन दुबळ्याचा, जगाच्या पोशिंद्याचा, लहान चिमुकल्याचा , बैलाच्या पाहुणचाराचा
समोर जे सुचतय ते लिहुन हा डोंगर वाढवा . आज पोळा आहे


 ♏ .

इयत्ता दुसरी बालभारती कविता

              कविता डाऊनलोड करण्यासाठी DOWNLOAD

             बटनावर क्लिक करा .कविता डाउनलोड होऊन जाईल .


२.१गवताचं पात.
 
२.२चला गड्यांनो खेळुया
  
२.३झरझर आला वारा
 
२.४थेंबा थेंबा कोठून येतोस
 
२.५जाऊ फुलांच्या जगात
 
२.६चैत्र महिणा
 
२.७धरू नको ही बरे
 
२.८ध्वज ऊंच धरू
 
२.९दोन पाय छोटे
 
१०
२.१०झाडावर राहावे
 
इयत्ता दुसरी बालभारती कविता ह्या कविता अरुण दुतोंडे 
व शिवानी बाठे यांनी आपल्या सुमधुर आवाजात उपलब्ध 
करून दिल्या आहेत . त्यांचे खूप खूप धन्यवाद ...

इयत्ता पाहिली बालभारती कविता

             कविता डाऊनलोड करण्यासाठी   या 

             बटनावर क्लिक करा .कविता डाउनलोड होऊन जाईल .



१.१पाऊस पडतो सरसर
 
१.२धोंड धोंड पाणी दे
 
१.३एक होती भिंगरी
१.४पाल अंकिता गौरी
१.५एक चिऊ आली
 
१.६झुई झुई झोका
 
१.७आवाज नाही
 
१.८ऊठ मुला
१.९ऊन असो वारा असो
१०
१.१०झाली सकाळ सरली रात्र

इयत्ता पाहिली बालभारती कविता ह्या कविता अरुण दुतोंडे 

व शिवानी बाठे यांनी आपल्या सुमधुर आवाजात उपलब्ध 

करून दिल्या आहेत . त्यांचे खूप खूप धन्यवाद ...