Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. २२) अतिथी देवो भव ॥ २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं. ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. ३४) परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं. ५८) जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र! ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये. ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ९६) अंथरूण बघून पाय पसरा. ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. १०५) विद्या विनयेन शोभते ॥ १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. १०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. १०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. १११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. ११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! ११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. ११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. १२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. १२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. १२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! १२९) ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. १३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. १३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीन ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. १३५) प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका. १३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! १३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. १४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. १४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ? १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर ! १४४) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही. १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. १४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे! .

शिक्षक, शिकवणे आणि आयसीटी

शिक्षक, शिकवणे आणि आयसीटी
सध्याचा माहितीसाठा आपल्याला काय माहीत आहे, आपली कशावर श्रद्धा आहे व कशावर नाही प्रशिक्षण महत्त्वाचे आहे आयसीटीमधील गुंतवणुकीमधून अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर शिक्षक प्रशिक्षण आणि निरंतर, सुसंगत व्यावसायिक विकास आवश्यक आहे.
शिक्षकाची भूमिका
आयसीटी वापरणा-या शिक्षकाची भूमिका जरी समन्वयकाची होत असली तरीही त्यामुळे वर्गामध्ये नेत्याची भूमिका बजावण्यासाठी त्याची गरज नष्ट होत नाही; पारंपारिक शिक्षकाची नेतृत्व गुणकौशल्ये आणि सराव आजही आवश्यक आहेत. (खासकरून धड्याचे नियोजन, तयारी आणि मागोवा यांशी निगडीत)
आयसीटी वापरताना धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे
आयसीटी वापरत असताना शिक्षकाने धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे; संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की जेथे नियोजन कमकुवत होते तेथे विद्यार्थांची कामगिरी बहुतेकदा दिशाहीन बनते आणि याचा परिणाम कमी उपस्थितीमध्ये होऊ शकतो.
अध्यापनशास्त्र
केवळ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येणार नाहीत. आयसीटी अस्तित्वात असणे या एकाच गोष्टीमुळे शिकवण्याची पद्धत बदलणार नाही. उलट योग्य वातावरण मिळाल्यास आयसीटी शिक्षकांना त्यांच्या शिकविण्याच्या पद्धती बदलण्यास मदत करू शकते. शिक्षकांचा अध्यापनशास्त्रासंबंधी अनुभव आणि तर्कशास्त्र त्यांच्या आयसीटीच्या वापरावर परिणाम करू शकते आणि शिक्षकाची आयसीटी वापरण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.
विद्यार्थी-केंद्री वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकांना मदत करणारे साहित्य म्हणून आयसीटीकडे पाहिले जाते. ओईसीडी (ऑर्गनाझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) देशांमध्ये संशोधनाद्वारे असे एकमत झाले आहे की जेव्हा आयसीटीची मदत घेऊन शिक्षक विद्यार्थ्याच्या समजून घेण्याच्या आणि विचार करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देतात तेव्हा आयसीटीचा सर्वात प्रभावशाली वापर होतो. पारंपारिक शिक्षक-केंद्री शिकविण्याच्या पद्धतींकडून अधिकाधिक विद्यार्थी-केंद्री पद्धतींकडे जाण्यासाठी आयसीटी हे एक महत्त्वाचे साधन आहे. सध्याच्या शिकविण्याच्या पद्धतींना पाठबळ देण्यासाठी/ त्यांचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांच्यातील बदलांना पाठबळ देण्यासाठी आयसीटीचा वापर केला जाऊ शकतो.
आयसीटी वापरणा-या शिक्षकांचा बालकशास्त्राचा अनुभव पारंपारिक पद्धती वापरून शिकविण्याच्या पद्धतींमधील थोडासा बदल असू शकतो, तसेच तो त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीतील आमूलाग्र बदलदेखिल असू शकतो. आयसीटीचा वापर सध्याच्या बालकशास्त्र पद्धतींना अधिक बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो तसेच तो शिक्षक-विद्यार्थ्यांमधील सुसंवाद साधण्याच्या पद्धतीतील बदलासाठीदेखिल वापरला जाऊ शकतो. माहिती सादर करण्यासाठी आयसीटीचा साधन म्हणून वापर करणे हे संमिश्र प्रभावशाली आहे.
आयसीटीचा सादरीकरणाचे माध्यम म्हणून वापर करणे (ओव्हरहेड आणि एलसीडी प्रोजेक्टर्स, दूरदर्शन संच, इलेक्ट्रॉनिक व्हाइटबोर्ड, मार्गदर्शित वेब-टूर्स - जेथे अनेक विद्यार्थी संगणक पडद्यावर एकाचवेळी सारखीच माहिती पाहू शकतात - इत्यादींद्वारा) हे संमिश्ररीत्या प्रभावी असल्याचे आढळून आलेले आहे - त्यामुळे कठीण संकल्पना समजण्यास आणि त्यावर वर्गात चर्चा करण्यास प्रोत्साहन मिळू शकते (खासकरून सिम्युलेशन म्हणजे आभासी प्रतिमेचा वापर करून) मात्र आयसीटीच्या अशा वापरामुळे शिकवण्याच्या शास्त्रातील जुन्या पारंपारिक पद्धतींचे पुनरुज्जीवन होऊ शकते आणि चर्चेच्या मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित होऊन ते वापरल्या जाणा-या साधनाकडे जाऊ शकते.
                                                                                                       साभार      -  विकासपीडिया

प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी



प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी

प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी
शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्याप्नात त्याचा वापर करावा.
प्रस्तावना - शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.
जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.
डॉ. राधाकृष्णन उत्कृष्ट शिक्षकाची व्याख्या करतात 'शिक्षकाने कमीतकमी शिकवून विदयार्थी स्वतः अधिकाधिक शिकेल यासाठी त्‍याला प्रशिक्षित केले पाहिजे.
सुप्रसिद्ध तत्ववेत्ता जॉर्ज बर्नार्ड शॉ याने एके ठिकाणी म्हटले आहे की, मुलांची स्वतः शिकण्याची इच्छा शिक्षकांनी मारू नये. उलट त्यांना स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा आहे.
शिक्षकाने स्वत: शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणा-याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये शिक्षकांनी आयुष्याच्या अंतापर्यंत विदयार्थी म्हणूनच जगायला हवे. त्यांनी शिकण्याची इच्छा कधीही मरू देता कामा नये. शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत नाही म्हणून शिक्षणाशी संबंधित सर्व विषयावर त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करावा.
शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ असते. विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा ख-या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो.
बालकाच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २० ०९: शिक्षकांची कर्तव्ये- (कलम २४ ब)
महाराष्ट्र शासनाने बालकाच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ ला केला आणि त्याची अंमलबजावणी एप्रिल २०१० पासून सुरू झाली. त्यात शिक्षकांची कर्तव्‍ये सांगितली आहेत.
1.शाळेत नियमितपणे वक्तशीरपणे हजर राहणे.
2.कायदयातील तरतुदीनुसार अभ्यासक्रम संचालित करणे, व तो पूर्ण करणे.
3.निर्धारीत कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे.
4.प्रत्येक बालकाच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करणे.
5.कोणतीही आवश्यकता भासल्यास अतिरित पूरक शिक्षण देणे.
6.माता-पिता आणि पालकाबरोबर नियमित सभा घेणे.
7.अध्ययनातील प्रगती याबाबतची माहिती पालकांना अवगत करणे.
8.विहित करण्यात येतील अशी सर्व कर्तव्ये पार पाडणे.
9.आनंददायी, नावीन्यपूर्ण, पद्धतीचा अध्यापनात वापर व तणावमुक्त अध्ययन प्रक्रियेचा अवलंब करणे.
10.शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व विशेष प्रशिक्षण पुरविणे.
11.अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, मूल्यमापन प्रक्रिया विकसन, प्रशिक्षण रचना व प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे
12.बालकांचे संकलित नोंदपत्रक, अंतर्भूत असणारी माहिती अदययावत ठेवणे.
या अधिनियमातील शिक्षकांच्या कर्तव्यामुळे शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे शिक्षकांनी ती टाळून चालणार नाही. शिक्षकांनी राबविण्याचे उपक्रम: शिक्षकांनी खालील उपक्रम राबवावेत.
१) शिक्षकाने ग्रंथालयात संस्कार करणा-या पुस्तकांच्या समावेश करावा.
२) शाळेच्या प्रशासकीय वेळेव्यतिरित इतर वेळात संस्कार वर्गाचे आयोजन करावे.
३) पालकांशी विदयार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा करणे.
४) शाळेतील बालसभांमधून (जयंती, पुण्यतिथी, इतर विशेष दिन मार्गदर्शनाचे जाणीवपूर्वक नियोजन करणे.
5. अध्‍यापन ही एक साधना मानणे.
6. तणावमुक्‍त अध्‍यापन करून सुसंस्‍कारित भावी पिढी निर्माण करणे.
7. व्‍यापक सातत्‍यपूर्ण सर्वकष मुल्‍यमापन करून मुलांचे प्रगतीपत्रक तयार करणे.
8. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे.
9. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून काम करणे.
१०) शासनाने निर्धारीत केलेली किमान शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे.
११) सकाळ-दुपार विदयार्थ्यांची हजेरी घेणे.
१२) गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे.
१३) कृतिशील अध्ययन, ज्ञान रचनावाद, बालस्नेही, स्वयं अध्ययन इत्यादी द्वारा ज्ञानदानाचे कार्य करणे.
१४) कार्यक्रमाचे सादरीकरण, सूत्र संचालन कसे करावे या विषयी मार्गदर्शन करणे.
१५) शैक्षणिक सहलीचे आयोजन करून ऐतिहासिक
१६) वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे मूल्य रुजविणे.
१७) मुलांचे नियमित स्वाध्याय तपासणे व झालेल्या चुका त्यांचे निदर्शनास आणून देणे.
१८) विविध स्पर्धांचे आयोजन करणे. उदा. हस्ताक्षर इत्यादी.
१९) विशेष गुणवत्ताप्राप्त विदयार्थ्यांना बक्षिसे देणे.
२०) शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे.
असा असावा शिक्षक :
)शिक्षक हा - शि म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष असावा.
)शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे. स्वत:चे विषयात पारंगतता प्राप्त करून घ्यावी. अध्यापन कला अवगत करून घ्यावी.
)शिक्षकाने आपले ज्ञान अदययावत करावे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
4. शिक्षकाला विदर्याबददल आत्मियता, प्रेम असावे आपल्‍याला विदयार्थ्‍यांचे कोणीही मुळे नुसान होत असेल तर त्‍या विरूध्‍द झगडण्‍यासाठी तयार असावे.
5. शिक्षक हा नवनिर्मितीचा निर्माता प्रसारीक असावा.
6. न्‍याय समता बंधुता धर्म निरपेक्षता वैज्ञानिक दृष्‍टीकोन, लोकशाही जीवनपध्‍दती या मुलांच्‍या समोर ठेवून शिक्षकांचे स्‍वतःला विकसित करावे.
7. विदयार्थ्‍यांवर आपले विचार न लादता शिक्षकाने विदयार्थ्‍यांच्‍या मताचा आदर करावा. त्‍याला प्रकटीकरणाची संधी दयावी. शिक्षकाने केवळ मार्गदर्शन करावे.
8. विज्ञान युगातील नवनवीन आव्‍हानांना सामोरे जाण्‍याइतके सक्षम बनविणारे शिक्षण शिक्षकाने विदयार्थ्‍यांना दयावे.  
९) शिक्षकाने स्वत: क्रियाशील, उपक्रमशील असावे. व विदयार्थ्‍याला क्रियाशिल राहण्‍याची प्रेरणा दयावी.
१०) शिक्षकाने धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद याचा विचार न करता सर्वांना समान शिक्षण दयावे.
११) शिक्षकाने विदयार्थ्‍यां तील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याची सवय विदयार्थ्यांना लावून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा.
१२) शिक्षकाने आपल्या बोलण्यातून, वागण्यातून चांगले
सदैव सत्य तेच बोलावे.
१५) शिक्षकाने जिज्ञासू वृत्ती धारण करून नित्य नव्या गोष्टी जाणून घ्याव्यात. शिक्षक व्यासंगी सखोल अभ्यास करणारा असावा.
१६) शिक्षकाने श्रमप्रतिष्ठा जोपासावी, कोणतेही काम कमी प्रतीचे न मानता सहजतेने करावे.
१७) शिक्षक अष्टपैलू, अष्टावधानी असावा, आपल्या विषयाव्यतिरित इतर कलागुणांची आवड त्याला असावी.
१८) शिक्षकाला आपल्या वरिष्ठांबद्दल प्रेम, आदर असावा.
१९) शिक्षकाने आपल्या अध्यापनात विविधता, नावीन्य, कल्पकता जोपासावी. विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून विदयार्थ्यांना विषय सहज समजेल अशा कौशल्याची जोपासना करावी.
२०) शिक्षकांमध्ये छोट्यामोठ्या गोष्टींचे निर्णय स्वत: घेण्याची क्षमता असावी.
२१) शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे.
२२) त्याचे घरी किमान १०० पुस्तकांचे ग्रंथालय असावे.
२३) शिक्षकाने पालक व समाज यांच्या संपर्कात नेहमी असावे. त्यांचे सहकार्याने समाजातील अनिष्ट प्रथा विरुद्ध आवाज उठवावा.
२४) शिक्षकाने आपली वाचन क्षमता, श्रवण क्षमता वाढवावी, भरपूर लेखन करावे.
२५) शिक्षकाने आपल्या विचाराशी ठाम असावे. ते विचार इतरांना पटवून देण्याचे भाषण कौशल्य व लेखन कौशल्य असले पाहिजे.
२६) शिखक साहसी, धैर्यवान, परोपकारी, निरपेक्ष वृत्तीचा असावा. त्याच्या प्रत्येक कामात रेखीवता व वाणीत मधुरता असावी. त्याची राहणी साधी व विचारसरणी उच्च असावी. दर्जाचा शिक्षक 'स्पष्टीकरण करतो' एक चांगला शिक्षक प्रात्यक्षिक करतो. आणि खरा थोर शिक्षक प्रेरणा देतो.
शिक्षक व्यवसायाची आचारसंहिता : १) शिक्षकांनी विदयार्थ्‍यांना राजकीय बाबीवर अथवा धर्म, जात, वंश आणि लिंग या खाजगी बाबीवर भेदभाव न करता समानतेची वागणूक दयावी. २) शाळेसाठी मिळालेल्या साधन सामुग्रीचा कोणत्याही शिक्षकाने स्वत:च्या वैयक्तिक, व्यापारी अथवा राजकीय हेतूसाठी उपयोग करणे निषिद्ध आहे. ३) शिक्षकाने विदयार्थ्यांचे मूल्यमापन नि:पक्षपातीपणे करावे.
लेखक : प्रा. गौतम दयाराम डांगे, गडचिरोली  ९४२२३६१ o७७

स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

प्राथमिक शिक्षण

              हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते. पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरु होते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे. विदयार्थ्याना प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मध्यांन भोजन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांसाठी शिष्यवृत्ती, अस्वच्छ परिसरातील कामगारांच्या बालकांसाठी शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती तसेच सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी उपस्थिती भत्ता यासारख्या विविध योजना प्राथमिक शिक्षणामध्ये राबविण्यात आल्या आहेत.