शिक्षक, शिकवणे आणि आयसीटी
सध्याचा माहितीसाठा आपल्याला काय माहीत आहे, आपली कशावर श्रद्धा आहे व कशावर नाही प्रशिक्षण महत्त्वाचे आहे आयसीटीमधील गुंतवणुकीमधून अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर शिक्षक प्रशिक्षण आणि निरंतर, सुसंगत व्यावसायिक विकास आवश्यक आहे.
शिक्षकाची भूमिका
आयसीटी वापरणा-या शिक्षकाची भूमिका जरी समन्वयकाची होत असली तरीही
त्यामुळे वर्गामध्ये नेत्याची भूमिका बजावण्यासाठी त्याची गरज नष्ट होत
नाही; पारंपारिक शिक्षकाची नेतृत्व गुणकौशल्ये आणि सराव आजही
आवश्यक आहेत. (खासकरून धड्याचे नियोजन, तयारी आणि मागोवा यांशी
निगडीत)
आयसीटी वापरताना धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे
आयसीटी
वापरत असताना शिक्षकाने धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे;
संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की जेथे नियोजन कमकुवत होते तेथे
विद्यार्थांची कामगिरी बहुतेकदा दिशाहीन बनते आणि याचा परिणाम कमी
उपस्थितीमध्ये होऊ शकतो.
अध्यापनशास्त्र
केवळ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येणार नाहीत. आयसीटी अस्तित्वात असणे या एकाच गोष्टीमुळे शिकवण्याची पद्धत बदलणार
नाही. उलट योग्य वातावरण मिळाल्यास आयसीटी शिक्षकांना त्यांच्या
शिकविण्याच्या पद्धती बदलण्यास मदत करू शकते. शिक्षकांचा
अध्यापनशास्त्रासंबंधी अनुभव आणि तर्कशास्त्र त्यांच्या आयसीटीच्या
वापरावर परिणाम करू शकते आणि शिक्षकाची आयसीटी वापरण्याची पद्धत
विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.
विद्यार्थी-केंद्री वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकांना मदत करणारे साहित्य म्हणून आयसीटीकडे पाहिले जाते. ओईसीडी (ऑर्गनाझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट)
देशांमध्ये संशोधनाद्वारे असे एकमत झाले आहे की जेव्हा आयसीटीची मदत
घेऊन शिक्षक विद्यार्थ्याच्या समजून घेण्याच्या आणि विचार
करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देतात तेव्हा आयसीटीचा सर्वात
प्रभावशाली वापर होतो. पारंपारिक शिक्षक-केंद्री शिकविण्याच्या
पद्धतींकडून अधिकाधिक विद्यार्थी-केंद्री पद्धतींकडे जाण्यासाठी
आयसीटी हे एक महत्त्वाचे साधन आहे. सध्याच्या शिकविण्याच्या पद्धतींना पाठबळ देण्यासाठी/ त्यांचा विस्तार
करण्यासाठी आणि त्यांच्यातील बदलांना पाठबळ देण्यासाठी आयसीटीचा वापर
केला जाऊ शकतो.
आयसीटी वापरणा-या शिक्षकांचा बालकशास्त्राचा
अनुभव पारंपारिक पद्धती वापरून शिकविण्याच्या पद्धतींमधील थोडासा
बदल असू शकतो, तसेच तो त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीतील आमूलाग्र
बदलदेखिल असू शकतो. आयसीटीचा वापर सध्याच्या बालकशास्त्र पद्धतींना अधिक
बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो तसेच तो शिक्षक-विद्यार्थ्यांमधील
सुसंवाद साधण्याच्या पद्धतीतील बदलासाठीदेखिल वापरला जाऊ शकतो. माहिती सादर करण्यासाठी आयसीटीचा साधन म्हणून वापर करणे हे संमिश्र प्रभावशाली आहे.
आयसीटीचा सादरीकरणाचे माध्यम म्हणून वापर करणे (ओव्हरहेड आणि एलसीडी
प्रोजेक्टर्स, दूरदर्शन संच, इलेक्ट्रॉनिक व्हाइटबोर्ड, मार्गदर्शित
वेब-टूर्स - जेथे अनेक विद्यार्थी संगणक पडद्यावर एकाचवेळी सारखीच
माहिती पाहू शकतात - इत्यादींद्वारा) हे संमिश्ररीत्या प्रभावी
असल्याचे आढळून आलेले आहे - त्यामुळे कठीण संकल्पना समजण्यास आणि
त्यावर वर्गात चर्चा करण्यास प्रोत्साहन मिळू शकते (खासकरून
सिम्युलेशन म्हणजे आभासी प्रतिमेचा वापर करून) मात्र आयसीटीच्या अशा
वापरामुळे शिकवण्याच्या शास्त्रातील जुन्या पारंपारिक पद्धतींचे
पुनरुज्जीवन होऊ शकते आणि चर्चेच्या मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित
होऊन ते वापरल्या जाणा-या साधनाकडे जाऊ शकते.
साभार - विकासपीडिया
No comments:
Post a Comment