Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. २२) अतिथी देवो भव ॥ २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं. ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. ३४) परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं. ५८) जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र! ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये. ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ९६) अंथरूण बघून पाय पसरा. ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. १०५) विद्या विनयेन शोभते ॥ १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. १०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. १०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. १११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. ११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! ११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. ११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. १२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. १२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. १२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! १२९) ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. १३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. १३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीन ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. १३५) प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका. १३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! १३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. १४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. १४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ? १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर ! १४४) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही. १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. १४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे! .

इयत्ता ४ थी , विषय – मराठी , धरतीची आम्ही लेकर


वर्ग ४ था - धरतीची आम्ही लेकरं
धरतीची आम्ही लेकरं हि कविता वाचुन खालील चाचणी सोडवा व आपल्याला २० पैकी किती मार्क मिळाले ते बघा . .त्यासाठी पुढील बटनावर क्लिक करा .


महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
  • कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
  • पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
  • औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  • अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
  • नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
  • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
  • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
  • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
  • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
  • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
  • पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
  • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  • उत्तरेस : मध्यप्रदेश.
  • पूर्वेस : छत्तीसगड.
  • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
  • गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
  • दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
  • मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
  • छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
  • आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
  • गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे भारतातील स्थान :
– भारतातील 29 राज्यांपैकी एक.
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार
  • अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
  • रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
  • व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
  • पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
  • लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
  • रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
  • क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
  • क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
  • समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
  • 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
    औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
  • 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
  • 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
  • 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
  • 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
    अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
  • 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
    भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)
  • 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)  

गरज कृतीयुक्त शिक्षणाची



गरज कृतीयुक्त शिक्षणाची- 
शीतल बापट
शिक्षणविषयक बदलती ध्येयधोरणं कायमच चच्रेत असतात. आगामी काळात कोणत्या क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या मनुष्यबळाची किती आवश्यकता आहे, याचा कोणताही अभ्यास न करता शिक्षणविषयक धोरणं जाहीर केली जातात आणि लाखोंच्या संख्येने पदवीधरांचा ओघ दर वर्षी सुरू राहतो. एका शैक्षणिक वर्षाचं अखेरचं पर्व सुरू होत असताना शिक्षण प्रक्रियेतल्या या त्रुटींची चर्चा करायलाच हवी.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही एक विशेष गुण असतो. तसा तो प्रत्येक विद्यार्थ्यांतही असतो. असे गुण ओळखून त्यांना वाव देणं, प्रगतीसाठी प्रोत्साहन देणं गरजेचं ठरतं. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला ख-या अर्थाने हातभार लागत असतो. खरं तर या संदर्भात पूर्वीच्या शिक्षण पद्धतीपासून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. परंतु शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं, औद्योगिक विकासाचं वारं वेगानं वाहू लागलं, त्यावेळी शिक्षणक्षेत्रात काही महत्त्वाचे बदल झाले. कारण या काळातल्या गरजा वेगळ्या होत्या. या प्रक्रियेत रोजगाराच्या दृष्टीने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला जात होता. त्याचा प्रभाव एवढा होता की, तीच प्रक्रिया शिक्षण पद्धतीतून पुढे सुरू राहिली. यात आऊटकमवर फोकस दिला जात आहे, मात्र इनपुटकडे लक्ष दिलं जात नाही. अर्थात, ग्लोबलायझेशनच्या या सुरुवातीच्या कालखंडातल्या शिक्षण पद्धतीचे काही चांगले परिणाम समोर आले, त्याचबरोबर काही दुष्परिणामही पाहायला मिळाले.
याचा सर्वात महत्त्वाचा अनुकूल परिणाम म्हणजे सार्वत्रिकीकरणामुळे शिक्षण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं; परंतु त्यातून निर्माण होणारी क्रिएटीव्हीटी साचेबद्ध राहिली. आणखी एक बाब म्हणजे या प्रक्रियेत अधिक प्रमाणात निपजलेली सेल्फ ओरिएंटेड मुलं इतरांशी स्पर्धा करू लागली; परंतु त्यांची स्वत:शी स्पर्धा नाही, असं दिसून आलं. शिवाय पालकांची मानसिकताही अशीच असायची. म्हणजे आपल्या मुलानं इतरांशी स्पर्धा करावी, असं पालकांना आवर्जून वाटायचं. त्यामुळे आपल्या मुलांनी वारंवार स्पर्धामध्ये भाग घ्यावा, असा पालकांचा आग्रह असतो. त्यातून प्रसंगी त्यांच्यावर दबाव आणला जातो. दहावी, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी शाखेची निवड करण्याबाबतही असंच चित्र ब-याच प्रमाणात पाहायला मिळतं. आपल्या मुलाचा उपजत ओढा कोणत्या विषयाकडे आहे, त्याला कोणता विषय अधिक आवडतो, पुढे जाऊन तो स्वत: कोण होऊ इच्छित आहे, याचा विचार बहुतांश पालक करत नाहीत. त्यावेळी पालक आपल्याला वाटतो तो निर्णय मुलांवर लादतात. मग पुढे अशा मुलांची प्रगती नीट झाली नाही, तर त्याचं खापरही मुलांवरच फोडलं जातं. त्यातही एखाद्या शाखेतल्या शिक्षणाला अधिक वाव आहे, असं लक्षात आलं किंवा तशी माहिती कुणी तरी दिली की त्यावर विश्वास ठेवत मुलांना त्याच शाखेच्या शिक्षणासाठी पाठवलं जातं. यामुळे ठरावीक शाखांमध्ये विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी, तर अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा असं परस्परविरोधी चित्र उभं राहतं. यामुळे आज बेरोजगारी वाढलेली दिसत असली तरी काही क्षेत्रात कुशल कामगारांना मागणी असूनही ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचं पाहायला मिळतं.
या पार्श्वभूमीवर आता काळ बराच बदलला आहे. किंबहुना, विविध क्षेत्रात वेगानं घडामोडी घडत आहेत. प्रगत तंत्रज्ञानातही वेगानं होणारे बदल विस्मयचकीत करायला लावणारे आहेत. मात्र, हे बदल लक्षात घेऊन येत्या काळात निर्माण होणा-या संधींचा विचार करून शिक्षण पद्धतीत काही बदल केले जात आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आजकाल संशोधन क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा जणू स्फोट होतोय. मात्र, या सा-या परिस्थितीत शिक्षण पद्धत तशीच राहणं उचित आहे का, या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. वास्तविक, आता शिक्षण घेणारी मुलं २०३० मध्ये पदवीधर होणार आहेत. त्यावेळी विविध क्षेत्रात काय बदल झालेले असतील, कोणतं प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात येईल आणि त्या दृष्टीने कोणत्या नव्या संधी उपलब्ध होतील, त्यासाठीचे निकष काय असतील, त्या वेळच्या गरजा काय असतील, याचा विचार करून आजची शिक्षण प्रक्रिया राबवली जाण्याची आवश्यकता आहे. खरं तर हे सारे मुद्दे लक्षात घेऊन शिक्षणाची रचना ठरवणं अवघड किंबहुना, आव्हानात्मक आहे. त्या दृष्टीने आपण आजच्या शिक्षणाकडे पूर्वीच्याच मानसिकतेतून पाहणार का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे चेंज मॅनेजमेंट अर्थात बदलाला सामोरं जाण्याची तयारी आणि त्यासाठीचं व्यवस्थापन या बाबींना विशेष महत्त्व प्राप्त होणं गरजेचं आहे.
पूर्वी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक आणि शिक्षक हेच ज्ञानाचे, माहितीचे मुख्य स्त्रोत असत. उर्वरित बाबी कुटुंबातून शिकायला मिळत असत. परंतु आता प्रगत माहिती-तंत्रज्ञानाच्या जमान्यात माहितीचं अवकाश अधिक व्यापक झालं आहे. या स्त्रोताच्या आधारे कुठलीही माहिती क्षणार्धात प्राप्त करणं शक्य होत आहे; परंतु या सा-या परिस्थितीत विद्यार्थ्यांची जीवनकौशल्यं विकसित होण्याच्या संधी कमी मिळतात, हे लक्षात घ्यायला हवं. सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर विशेष भर दिला जात आहे. त्याच प्रमाणे शिक्षक आणि पालकांकडून सततच्या अभ्यासासाठी दबाव टाकणं, त्यांना या क्षेत्रातल्या स्पध्रेविषयी सातत्यानं उपदेश करणं अशा स्वरूपाचे प्रयत्न होताना पहायला मिळतात. मात्र, यात मुलांना समजून घेणं, त्यांच्या क्षमता काय आहेत, मर्यादा काय आहेत या बाबी समजून घेतल्या जाणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. त्या दृष्टीने शिक्षकांनीही आपल्या भूमिकेत बदल करायला हवा. विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि कृतीयुक्त शिक्षण द्यायला हवं. मुख्यत्वे परीक्षा पद्धत बदलण्याची गरज आहे. आजकाल विद्यार्थ्यांना स्वत:ला ओळखून करिअर गायडन्सच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची विशेष गरज आहे. कारण कोणताही विद्यार्थी कौशल्यं आत्मसात करून वा उपजत कौशल्यात आणखी भर टाकत कारकिर्दीच्या दृष्टीने स्वत:ला सिद्ध करू शकतो. किंबहुना, स्वत:चं स्थान निर्माण करू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाव दिला जाण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं, तर वास्तवात परीक्षांच्या निकालाची टक्केवारी वाढवण्यापेक्षा त्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना किती ज्ञान मिळालं, याचा विचार होणं आवश्यक आहे.
खरं तर आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा सरकारचा निर्णय चांगला होता; परंतु या निर्णयाची नीट अंमलबजावणी झाली नाही. शिवाय वेगवेगळे अर्थ काढून या निर्णयावर टीकाच करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अन्य देशांमधील शैक्षणिक तसंच परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आपल्याकडे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत स्पर्धात्मकता अधिक असून त्या मानाने संधींची वानवा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पुढील प्रवेश सुलभ होणं हाच गुण मिळवण्याचा महत्त्वाचा निकष मानला जात आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही नववी, दहावीतच विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाचे वेध लागलेले असतात. वस्तुत: दहावीतल्या गुणांचं महत्त्व तेवढय़ापुरतंच असतं. आपल्याकडे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर होण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. परंतु ठरावीक महाविद्यालयांमध्येच प्रवेशासाठी अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचं पहायला मिळतं. डोक्यात बसलेल्या प्रवेशासाठीच्या अशा काही ठाम कल्पनांना छेद देण्याची गरज आहे.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये काळाच्या ओघात बदल होत जाणं हे सुदृढ शिक्षणप्रणालीचं शिक्षण आहे. हे लक्षात घेऊन प्रचलित शिक्षण पद्धतीत कालसुसंगत बदल करत राहणं गरजेचं आहे. तसे बदल होत असले तरी त्यांची गती वाढण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सर्व घटकांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. शिक्षण प्रक्रियेत एक-एक मूल घडवणं म्हणजे बंदरात जहाज बांधण्यासारखं आहे. कोणतंही बांधलं जाणारं जहाज बंदरात सर्वात सुरक्षित असतं; परंतु त्याची रचनाच सागरात जाण्यासाठी करण्यात आलेली असते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या नौकेला २१व्या शतकात कुठली दिशा द्यायची, तिला कुठल्या वादळांचा, आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, याचा विचार करून त्या संदर्भात तयारी करून घेणं हे आजच्या शिक्षण पद्धतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
(लेखिका श्यामची आईफाऊंडेशनच्या संस्थापक संचालिका आहेत.)


ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद काय आहे आणि काय नाही?
-नीलेश निमकर
गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्‍याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्‍यांशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे.
रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.
कोरी पाटी सिद्धांत
‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्‍या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही !
वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा
मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले.
मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्‍या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपण विचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना.
आकलनवाद
वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. ‘मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे’ अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे.
ज्ञानरचनावाद
मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्या ज्ञानाची रचना करत असते असा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल आपल्या ज्ञानाची रचना कशी करते यावर ज्ञानरचनावाद बराच प्रकाश टाकतो. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे , तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गती मिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेले उदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
१. सुरुवातीला ‘बाबा’ या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतो. त्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींना मूल बाबा म्हणते.
२. हळू हळू त्यातून आजोबा, दादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतात. मग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूल दादा वा आजोबा म्हणू लागते. या टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबा, बाबा व दादा असे तीन गट आहेत.
३. काका, मामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.
४. हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.
मुलाने संकल्पना बांधण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता वर्तनवादी दृष्टिकोनातून वरील घटना पाहायची झाली तर बाबा, दादा, आजोबा या शब्दांचे (खरे तर आवाजांचे) अभिसंधान वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींशी होते व त्यातून मूल हे वेगवेगळे शब्द उच्चारते असे म्हणावे लागेल. पण असे सुटे सुटे शब्द उच्चारणे हे काही मुलाची नात्यांबाबतची समग्र समज दाखवत नाही. मुलाच्या शिकण्याची प्रक्रिया उलगडण्यासाठी वर्तनवाद तोकडा पडतो म्हणजे काय याची या उदाहरणावरून कल्पना यावी.
महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानरचनावादात मुलांच्या अनुभवाला शिकण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान आहे. समृद्ध अनुभवांखेरीज मुले ज्ञानाची रचना करणार नाहीत असा ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे. म्हणूनच अनेकदा हाताने करून शिकणे प्रभावी ठरते असा आपला अनुभव आहे. मात्र ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवण्यासाठी नेहमीच काही तरी हाताने करणे गरजेचे आहे हापण एक गैरसमज आहे. किंवा हाताने काहीतरी करायला दिले म्हणजे ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवले असे होत नाही. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन विकसित झाला म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्यात एक नेमकेपणा येतो, प्रत्येक मुलाची ज्ञानरचनेची प्रक्रिया वेगळी असल्याचे लक्षात आल्याने शिकवण्यात जी लवचीकता येते हे महत्त्वाचे आहे.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्ञानरचनावादातून पुढे येतो. तो म्हणजे मुलांच्या धारणा एकदम बनत नाहीत तर त्या बनतात, मोडतात आणि पुन्हा नव्याने बनतात. त्यामुळे आपण जसे सांगू तसेच्या तसे मूल ग्रहण करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. इयत्ता आठवीत मुलाने तयार केलेली सूर्यमालेसारखी अणूची धारणा (म्हणजे मधे केंद्रक आणि भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन अशी) आणि प्रत्यक्ष अणूची रचना यात मोठेच अंतर आहे. पण म्हणून आपण आठवीच्या मुलाची धारणा चुकीची म्हणत नाही. तर अणूची संकल्पना समजून घेण्यातली ती एक अनिवार्य पायरी मानतो. म्हणजेच ज्ञानरचनावादात मुलांच्या तथाकथित चुकांकडे शिकण्यातली एक पायरी म्हणून बघितले जाते.
आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून कुणी विचारेल, ‘जर मूल स्वत:च ज्ञानाची रचना करणार असेल तर शिकवणार्‍यांचे काय काम?’ मात्र हा ज्ञानरचनावादाचा विपर्यास होईल. ज्ञानरचनावादात मोठ्यांसोबतच्या आंतरक्रियेलाही महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानरचनावाद ही संकल्पना जशीजशी विकसित होत गेली तसेतसे मोठ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधिकाधिक पुढे आले. भाषा हे महत्त्वाचे साधन बर्‍याच प्रमाणात मोठ्यांशी झालेल्या आंतरक्रियेतूनच मुलांना मिळते. मूल ज्या समाजात वाढते त्या समाजातून मिळालेली भाषा हा मुलांच्या ज्ञानरचनेतील महत्त्वाचा घटक आहे.
तसेच एखाद्या मुलाची ज्ञानाची सध्याची धारणा लक्षात घेऊन तिथून कोणत्या नव्या धारणेपर्यंत मूल मोठ्यांच्या मदतीने पोहचू शकेल याचा अंदाज शिकवणार्‍याला घ्यावा लागतो.
ज्ञानरचनावादाचे काही पैलू आपण पाहिले. ते एका दृष्टिक्षेपात पुढीलप्रमाणे मांडता येतील.
१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.
२. ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.
३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.
४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्‍या माणसाला असावे लागते.
ज्ञानरचनावाद हा शिकण्याबाबतचा सिद्धांत बराच प्रगत असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचे समग्र वर्णन करत नाही. शिकण्याच्या इतर सिद्धांतांप्रमाणेच तोही एक आंशिक सिद्धांत आहे. पण मुलांच्या शिकण्याचे बरेच नवे आयाम या सिद्धांतामुळे आपल्यासमोर आले हे खरे. शिकवताना शिक्षकाला अनेक सिद्धांतांचा एकत्र आधार घेऊन शिकवावे लागते. हे वास्तव लक्षात घेता शिकण्याबाबतचे सर्वच सिद्धांत अभ्यासून, पचवून डोळसपणे शिकवता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे.
1. पिंजर्‍यात बंद असणार्‍या एखाद्या उंदराला ‘कळ दाबल्यावर अन्न मिळते’ हे अपघाताने समजले, तर तो हवे तेव्हा कळ दाबून अन्न मिळवायला शिकतो. कळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतो. काही काळाने जर वारंवार कळ दाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतो. कळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडला जातो त्याला अभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुख प्रक्रिया आहे.
2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केले आहे. अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाही. सगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतात. मात्र लहानग्या आयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहे, त्यामुळे त्याने बसले, उठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे. कोणीही कधीही न वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देता येत नाही.
3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्या, पूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणे सोडवायला दिली. त्यांना असे दिसले की बर्‍याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाच, पण गंमत म्हणजे ४-३ =? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्या. इयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्‍या वजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होती ती पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंत मुलांचा स्वाभाविकपणेच गोंधळ झाला. ही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वास असणारा शिक्षक़ म्हणेल.
4. उदाहरणार्थ एखादे मूल अपूर्णांक शिकते आहे. अपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचे वाचन, लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेच जमेल असे नाही. काही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीने, शैक्षणिक साधने वापरून काम केले म्हणजे मग लहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.
शिक्षण तज्ज्ञ निलेश निमकर यांचा लेख

सदाबहार देशभक्तीपर गीते

           नेहमी परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना ऐकविण्या करिता देशभक्तीपर गीते फक्त एक क्लिकवर DOWNLOAD या शब्दावर क्लिक करून डाउनलोड करून घ्या .

अ.क्र.
देशभक्तीपर गीताचे  नाव
डाउनलोड करा
·         ये वतन ये वतन हमको तेरी कसम
·         वतन कि राहमें वतन के
3
·         सबारमतीके संत तुने कर दिया कमाल
·         ये देश हे वीर जवानोका (रिमिक्स )
·         नन्हें मुन्हे बच्चे तेरी मुट्टीमे क्या है
·         नन्हा मुन्हा राही हु देश का सिपाही हु
·         कर  चले हम फिदा जाणे तण साथीओ
·         जिस देश मे गंगा बहेती है
·         वतन पे जो फिदा होगा
१०
·         भारत हमको जाण से प्यारा है
११
·         सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना
१२
·         रंग दे बसंती (जूने )
१३
·         माँ तुझे सलाम
१४
·         हमको मन  कि   शक्ती देना
१५
·         मिले सूर मेरा तुम्हारा