Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

.

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. २२) अतिथी देवो भव ॥ २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा. २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा. २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्त्याने आणि सन्मानाने करा. ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक. ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं. ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. ३४) परमेश्वराच्या आशीर्वादा शिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही. ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची ! ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो. ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !! ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही. ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही. ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं. ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते. ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा. ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं. ५८) जगण्यात मजा आहेच पण त्याहून अधिक मजा फ़ुलण्यात आहे ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र! ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव ! ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका. ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये. ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा. ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे. ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो. ८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही ९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही. ९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात. ९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! ९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ९६) अंथरूण बघून पाय पसरा. ९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. १००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात. १०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. १०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥ १०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात. १०५) विद्या विनयेन शोभते ॥ १०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे. १०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. १०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. १०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. ११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते. १११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही. ११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा. ११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ! ११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. ११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच ! ११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो. ११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा. ११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. ११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. १२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! १२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. १२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. १२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका. १२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. १२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. १२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं ! १२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. १२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता ! १२९) ज्यादिवशी आपली थोडी ही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा. १३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार ! १३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. १३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. १३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीन ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. १३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो. १३५) प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका. १३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र ! १३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! १३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. १३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. १४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. १४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. १४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का ? १४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फुल आणि प्राणा शिवाय शरीर ! १४४) टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही. १४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका. १४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे! .

शिष्यवृत्ती परीक्षा माहिती


उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं
१) शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाआनुदानित/
स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.
२) आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम राबविणा-या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे:-
अ) सदर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्‍यां साठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.
ब) सदर विद्यार्थ्‍यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये सुधारित विहीत शुल्क आकारण्यात येईल.
क)  सदर विद्यार्थ्‍यांची स्‍वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
ड) सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम 
कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.
इ) उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येत

 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता:-
१) विदयार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
२) विदयार्थी शासनमान्य शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता ५ वी किंवा इयत्ता ८ वीत शिकत असावा.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा:-
विदयार्थ्‍यांचे वय १ जून रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.
प्रवर्ग दि.१ जून रोजी कमाल वयोमर्यादा
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ५ वी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ८ वी)
सर्व प्रवर्ग ११ वर्षे १४ वर्षे दिव्यांग १५ वर्षे १८ वर्षे
५) सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्‍तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४० % पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे
६) सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परिक्षेच्या आधारे दिली जाईल.

 परीक्षेची तारीख व वार
क) शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद जाहीर करेल त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या/तिस-या रविवारी घेण्यात येईल.
ख) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाइल.
सदर परीक्षेसाठीचे अर्जा हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत
 (Website: http://www.mscepune.in)

 परीक्षा शुल्कः
बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश शुल्क रु.२०/-  परीक्षा शुल्क रु.६०/-   एकूण 80/-
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती,भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी
प्रवेश शुल्क रु.२०/- परीक्षा शुल्क रु.००/- एकूण र.२०/- याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी  रु.२००/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल. १०) परीक्षेचे माध्यम:-
मराठी/हिंदी/गुजराती/उर्दू/इंग्रजी/सिंधी/तेलगू/कन्नड असे असेल. इयत्ता ५वी व इयत्ता ८ वी च्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्‍यांकरिता गणित व बुद्धमत्ता चाचणी या विषयांचा इंग्रजी माध्यमाकरिता जो पेपर  असेल तोच पेपर उपलब्ध करुन दिला येईल.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेल्या इ.१ ली ते इ.५वी च्या  अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व इ.१ ली ते इ.८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) घेण्यात येईल.पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील.

प्रश्नांची काठिण्य पातळी :-
१) कठीण प्रश्न ३०%
२) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%
3) सोपे प्रश्‍न 2%

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप :-
प्रत्येक पेपरसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच देण्यात येतील.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय
 अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये 
कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही
 पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
१२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती
परीक्षा (इयत्ता ८ वी) पुढीलप्रमाणे असेल:-
पेपर       विषय                   प्रश्न संख्‍या    गुण              वेळ
 1          प्रथम भाषा              25                 50             १ तास ३० मिनिटे
             गणित                     50               100
              एकूण                     75               150
          तृतीय भाषा               25              50             १ ता ३० मिनिटे
             बुध्दिमत्ता चाचणी       50            100
              एकूण                      75              150

 शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी:-
१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्‍याने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी) / माध्यमिक (इयत्ता ९ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्‍यांची शिष्यवृत्ती रदद करण्‍यात येईल.
२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल.यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्‍यांस शिष्यवृत्ती मिळणार नाही.
३) विद्यार्थ्‍यां ने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्‍यां ने/पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.
१६) "ग्रामीण" या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत विश्लेषण:-
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या
नियंत्रणाखाली सर्व गावे/वस्ती (लोकसंख्या विचारात न घेता) तसेच नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रात ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमधील शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्‍यांची गणना ग्रामीण भागात करण्‍यात यावी.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) 
परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं
पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-
१)शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायमविनाआनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.
२) आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम राबविणा-या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे:-अ) सदर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्‍यां साठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.ब) सदर विद्यार्थ्‍यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये सुधारित विहीत शुल्क आकारण्यात येईल.क)  सदर विद्यार्थ्‍यांची स्‍वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ड) सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.इ) उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.

 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता:-
१) विदयार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे 
वास्तव्य असावे.
२)विदयार्थीशासनमान्यशासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायमविनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता ५ वी किंवा इयत्ता ८ वीत शिकत असावा.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा:- 
विदयार्थ्‍यांचे वय १ जून रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.
प्रवर्ग दि.१ जून रोजी कमाल वयोमर्यादा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ५ वी) पूर्व माध्यमिक
 शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ८ वी)सर्व प्रवर्ग ११ वर्षे १४ वर्षेदिव्यांग १५ वर्षे १८ वर्षे
५) सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्‍तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४० % पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे६) सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परिक्षेच्या आधारे दिली जाईल.

परीक्षेची तारीख व वार 
क) शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद जाहीर करेल त्यानुसार 
साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या/तिस-या रविवारी घेण्यात येईल.
 ख) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाइल.

परीक्षा शुल्कः
बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी
 प्रवेश शुल्क रु.२०/- परीक्षा शुल्क रु.६०/- एकूण 80/- 
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती,भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी  प्रवेश शुल्क रु.२०/- परीक्षा शुल्क रु.००/-एकूण र २O/-
याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु.२००/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल
 अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप :- 
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार 
केलेल्या इ.१ ली ते इ.५वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व इ.१ ली ते इ.८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) घेण्यात येईल.पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील. 
प्रश्नांची काठिण्य पातळी :- 
१) कठीण प्रश्न ३०% २) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०% 3) सोपे प्रश्‍न 2% प्रश्नपत्रिकेचे स्वरुप :- प्रत्येक पेपरसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच देण्यात येतील. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा (इयत्ता ८ वी) पुढीलप्रमाणे असेल:- 
पेपर              विषय                   प्रश्न संख्‍या        गुण              वेळ
 1                   प्रथम भाषा              25                    50             १ तास ३० मिनिटे
                      गणित                     50                   100
                      एकूण                     75                    150
                तृतीय भाषा               25                     50             १ ता ३० मिनिटे
                  बुध्दिमत्ता चाचणी       50                    100
                    एकूण                      75                     150

शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी:
१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्‍याने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी) / माध्यमिक (इयत्ता ९ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्‍यांची शिष्यवृत्ती रदद करण्‍यात येईल.
 २) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल.यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्‍यांस शिष्यवृत्ती मिळणार नाही.
३) विद्यार्थ्‍यां ने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्‍यां ने/पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीनमुख्याध्यापकांमार्फत संबधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.
४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही१४) शिष्यवृत्तीचे वितरण :-शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्‍यांच्‍या  बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या  अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व |FSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. सदर माहितीसह विद्यार्थ्‍यां च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांना पाठवावा. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांचेवर राहील.
साभार - विकासपीडिया 

No comments: